मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : बनावट पेमेंट अॅपद्वारे फसवणूक; एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे घेऊन बनावट पेमेंट अॅपद्वारे पैसे हस्तांतरित केल्याचा बनाव करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

बनावट पेमेंट अॅपद्वारे फसवणूक; एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य
बनावट पेमेंट अॅपद्वारे फसवणूक; एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य

Pune Crime : आरोपी १२ तासांत जेरबंद; कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे घेऊन बनावट पेमेंट अॅपद्वारे पैसे हस्तांतरित केल्याचा बनाव करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. या कारवाईत कोरेगाव पार्क आणि खराडी पोलीस ठाण्यातील असे दोन गुन्हे उघडकीस आले असून, ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
रोहित सुभाष चव्हाण (वय २५,रा. फुरसुंगी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने करण प्रकाश चव्हाण याच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील साथीदाराचा शोध सुरू आहे..https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जात होती. त्यानंतर बनावट पेमेंट अॅपचा वापर करून पैसे ट्रान्सफर झाल्याचा बनाव केला जात होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अमित जाधव आणि सचिन पवार यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने कामशेत येथील शिवाजी चौकातील राज मोबाईल शॉपी येथे संशयित रोहित चव्हाण याला शोधून काढले. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चौकशी आणि पुढील तपासादरम्यान आरोपीने साथीदाराच्या मदतीने केलेले दोन गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत एक मोबाईल आणि एक ऑटो रिक्षासह सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आणि खराडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कोरेगाव पार्क येथील गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५), तर खराडी येथील गुन्ह्यात कलम ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवरकर आणि सहायक पोलीस आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) साहेबा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें