Pune News : राजकीय दबावाला झुगारून धायरीतील आरएमसी प्लांट उध्वस्त
Pune News : महत्वाचे मुद्दे
2 मिनट पठन

Pune News : मंत्रालयातून आलेले फोन आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप फेटाळून लावत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन प्रमुखांची धाडसी कामगिरी; प्रयेजा सिटी आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या नागरिकांनी या विरोधात वारंवार आंदोलने केली होती https://maharashtramirror.com/ Pune news
Pune News : महत्वाचे मुद्दे
Pune News :यापूर्वी राजकीय दबावामुळे ही कारवाई ऐनवेळी दोन वेळा रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होताhttps://maharashtramirror.com/ Pune news
*महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर पुन्हा एकदा कारवाई थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह मंत्रालयातून प्रचंड दबाव आला
*वडगाव-धायरी परिसरातील कॅनॉलजवळील बेकायदा 'रेडी मिक्स काँक्रिट' प्लांटवरील धडक कारवाई अखेर तडीस
*परिसरात कोणत्याही प्रकारची कायदेशीर किंवा पर्यावरणविषयक परवानगी न घेता हे घातक प्रकल्प चालवले जात होते
*मानवी वस्त्यांच्या अगदी जवळ आणि जलस्रोतांच्या लगत हे प्लांट असल्याने संपूर्ण परिसराला प्रदूषणाचा प्रचंड फटका बसत होता
"कारवाई रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून बराच दबाव आला, मात्र नागरिकांचे आरोग्य आणि कायदा यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही." - सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे मनपाhttps://maharashtramirror.com/ Pune news
Pune News : पुणे, धनश्री ओतारी
Pune News :पुणे : महानगरपालिका (मनपा) हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असतानाच, वडगाव-धायरी परिसरातील कॅनॉलच्या बाजूला बेकायदा पद्धतीने सुरु असलेल्या 'रेडी मिक्स काँक्रिट' (आरएमसी) प्लांटवर अखेर बुधवारी कारवाई करण्यात आली. यापूर्वी राजकीय दबावामुळे ही कारवाई ऐनवेळी दोन वेळा रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.https://maharashtramirror.com/ Pune news
दरम्यान, अखेर राजकीय दबावाला झुगारून गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली वडगाव-धायरी परिसरातील कॅनॉलजवळील बेकायदा 'रेडी मिक्स काँक्रिट' प्लांटवरील धडक तोडक कारवाई अखेर तडीस नेण्यात आली.
"कारवाई रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून बराच दबाव आला, मात्र नागरिकांचे आरोग्य आणि कायदा यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही," अशा ठाम शब्दांत भूमिका मांडत उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकाम पूर्णपणे उद्ध्वस्त केले असल्याची माहिती बनकर यांनी 'महाराष्ट्र मिरर'शी बोलताना दिली.
सलग दोन वेळा हुलकावणी, पण तिसऱ्यांदा थेट नांगर
वडगाव-धायरी परिसरातील कॅनॉलच्या लगत बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या या आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याचे नियोजन महापालिकेने यापूर्वी दोन वेळा केले होते. मात्र, दोन्ही वेळी ऐन मोक्याच्या क्षणी सत्ताधारी पक्षातील वजनदार आमदारांचे फोन आणि वरिष्ठ पातळीवरून आलेले आदेश यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. खुद्द सोमनाथ बनकर यांनीही राजकीय दबावामुळे यापूर्वी मोहीम ऐनवेळी रद्द करावी लागल्याची प्रामाणिक कबुली दिली होती.
दरम्यान, बुधवारी जेव्हा पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पुन्हा एकदा कारवाई थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह मंत्रालयातून प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला. मात्र, यावेळी उपायुक्त बनकर यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या मध्यस्तीला भीक न घालता थेट कारवाईचे आदेश दिले. अवघ्या काही तासांतच महापालिकेच्या बुलडोझरने संपूर्ण आरएमसी प्लांटचा सांगडा पाडून जागा मोकळी केली.
प्रदूषणाच्या विळख्यातून धायरीकरांची सुटका
वडगाव-धायरी परिसरात कोणत्याही प्रकारची कायदेशीर किंवा पर्यावरणविषयक परवानगी न घेता हे घातक आरएमसी प्रकल्प चालवले जात होते. मानवी वस्त्यांच्या अगदी जवळ आणि जलस्रोतांच्या लगत हे प्लांट असल्याने संपूर्ण परिसराला प्रदूषणाचा प्रचंड फटका बसत होता.
आरएमसी प्लांटमधून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी थेट नदी आणि कॅनॉलमध्ये सोडले जात होते. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना धोका निर्माण झाला होता व परिसरात दुर्गंधी पसरली होती. दिवस-रात्र चालणाऱ्या या क्रशर आणि मिक्सरच्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांची झोप उडाली होती. हवेत उडणाऱ्या सिमेंटच्या सूक्ष्म धुळीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये श्वसनाचे तसेच दम्याचे आजार वेगाने बळावले होते. प्रयेजा सिटी आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या नागरिकांनी या विरोधात वारंवार आंदोलने केली होती. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे धायरीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
