Pune News : गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य; डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांचा महिलांना खास संदेश
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवाच्या उत्साहात पुणे शहर रंगलं असताना महिला मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळीही गणेश मंडळे आणि उत्सवाच्या ठिकाणी सहभागी होताना दिसतात.
1 मिनट पठन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवाच्या उत्साहात पुणे शहर रंगलं असताना महिला मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळीही गणेश मंडळे आणि उत्सवाच्या ठिकाणी सहभागी होताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या झोन ५ च्या डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली. 'महाराष्ट्र मिरर' कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी गणेशोत्सव, महिला सुरक्षा आणि या काळात महिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत मनमोकळा संवाद साधला.https://maharashtramirror.com/ Pune News
"गणेशोत्सव हा केवळ नागरिकांसाठीच नाही, तर पोलिसांसाठीही उत्साहाचा काळ असतो. प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे कुटुंब असले, तरी गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षा हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे,'' असे शिवणकर यांनी सांगितले. त्यामुळे घरच्या गणपतीसोबतच शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला ही प्राधान्य देत पोलिस आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना मदत मिळावी यासाठी उपलब्ध असलेल्या महिला मदत केंद्रांसह पोलिसांच्या विविध यंत्रणांमार्फत सुरक्षेची काळजी घेतली जाते. गर्दीच्या ठिकाणी महिलांनी कोणतीही अडचण आल्यास पोलिसांची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिलांसाठी खास संदेश
यावेळी डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांनी महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला. महिलांसमोर आज अनेक संधी आहेत; त्या संधी कोणत्याही भीतीशिवाय स्वीकारा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि आपल्या क्षेत्रात पुढे जा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/
