मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून तरुणाला क्रिप्टोचा गंडा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाने बनावट प्रोफाइल तयार करून तरुणाशी मैत्री केली.

वक
विक्रांत कुलकर्णी

3 मिनट पठन

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून तरुणाला क्रिप्टोचा गंडा सहा महिने मुलीच्या आवाजात संवाद; १.५० लाखांची फसवणूक करणारा २५ वर्षीय तरुण सायबर पोलिसांच्या जाळ्यात
स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून तरुणाला क्रिप्टोचा गंडा सहा महिने मुलीच्या आवाजात संवाद; १.५० लाखांची फसवणूक करणारा २५ वर्षीय तरुण सायबर पोलिसांच्या जाळ्यात

Pune News : सहा महिने मुलीच्या आवाजात संवाद; १.५० लाखांची फसवणूक करणारा २५ वर्षीय तरुण सायबर पोलिसांच्या जाळ्यात

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाने बनावट प्रोफाइल तयार करून तरुणाशी मैत्री केली. तब्बल सहा ते सात महिने चॅटिंग केले आणि फोनवर मुलीच्या आवाजात बोलून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १४६८ USDT म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये वळवून घेतले. विशेष म्हणजे, जिच्याशी आपण इतके महिने बोलत आहोत ती ‘प्रिन्सिका’ प्रत्यक्षात मुलगी नसल्याचे पोलीस तपासात समोर आले. मुलीच्या नावाने आणि आवाजात संवाद साधणारा कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर, पुणे) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे शहर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.https://maharashtramirror.com/ Pune news

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १९ (२), ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (सी), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदमाने याला ३१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या स्नॅपचॅट खात्यावर काही महिन्यांपूर्वी ‘प्रिन्सिका जोशी’ नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तक्रारदाराने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये स्नॅपचॅटवर संवाद सुरू झाला. हळूहळू या संवादाचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर सहा ते सात महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग आणि मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू होते. फोनवरही मुलीचाच आवाज ऐकू येत असल्याने तक्रारदाराला समोरील व्यक्तीच्या ओळखीबाबत संशय आला नाही.https://maharashtramirror.com/ Pune News

दीर्घकाळ संवाद साधून विश्वास संपादन केल्यानंतर कथित ‘प्रिन्सिका’ने तक्रारदाराला क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा आणि आकर्षक परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने वेळोवेळी स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमधून संबंधित क्रिप्टो वॉलेटवर एकूण १४६८ USDT हस्तांतरित केले. या रकमेचे अंदाजे मूल्य दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

काही कालावधीनंतर तक्रारदाराने गुंतवणुकीतील वाढ, परतावा आणि मूळ पैसे परत मिळण्याबाबत विचारणा सुरू केली. त्यानंतर मात्र ‘प्रिन्सिका जोशी’ नावाने संपर्कात असलेल्या व्यक्तीने स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम खाते बंद केले. संपर्कही टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय बळावल्याने तक्रारदाराने पुणे शहर सायबर पोलिसांकडे धाव घेतली.https://maharashtramirror.com/ Pune News

सायबर पोलिसांनी स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक आणि उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्यातून कुणाल जितेंद्र अदमाने याचे नाव समोर आले. मात्र, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्याशी संवाद साधणारी व्यक्ती ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी होती, तर तांत्रिक तपास एका पुरुषापर्यंत पोहोचत होता. त्यामुळे पोलिसांसमोरही या प्रकरणाचे कोडे निर्माण झाले.

अदमाने याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांच्या तपासानुसार, ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती. अदमाने यानेच मुलीच्या नावाने बनावट स्नॅपचॅट आयडी तयार केला होता. तोच तक्रारदाराशी चॅटिंग करीत होता आणि मोबाईलवर मुलीचा आवाज काढून बोलत होता. अदमाने हा उच्चशिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

या पद्धतीने त्याने सहा ते सात महिने आपली खरी ओळख लपवून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे वळवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने अशाच प्रकारे स्नॅपचॅट किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलीची बनावट ओळख तयार करून आणखी व्यक्तींची फसवणूक केली आहे का, याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. केवळ फोटो, नाव किंवा आवाजावरून समोरील व्यक्तीची खरी ओळख निश्चित होत नाही. तसेच क्रिप्टोकरन्सीत कमी कालावधीत मोठा आणि निश्चित परतावा मिळवून देण्याच्या आमिषावर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास चॅट, मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया आयडी, क्रिप्टो वॉलेटचा पत्ता आणि व्यवहाराची माहिती सुरक्षित ठेवून तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासो चव्हाण, जान्हवी बढेकर, रविंद्र साळवे, संदीप मुळे, संदीप कारकूड, सुप्रिया होळकर, कृष्णा मारकड, श्रीकृष्ण नागटीळक आणि सोनाली चव्हाण यांच्या पथकाने केली.

शेयर करें