मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime: विजय रौंदळ, अभी विजय रौंदळ आणि देवेंद्र शहा यांच्यावर गुन्हा

Pune Crime : पुणे: पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिकाची तब्बल १२ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि ६० कोटींपेक्षा जास्त रकमेची बेकायदेशीर वसुलीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

एका प्रसिद्ध बांधकाम समूहाची १२.४० कोटींची फसवणूक; बंडगार्डन पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल
एका प्रसिद्ध बांधकाम समूहाची १२.४० कोटींची फसवणूक; बंडगार्डन पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime : एका प्रसिद्ध बांधकाम समूहाची १२.४० कोटींची फसवणूक; बंडगार्डन पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे: पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिकाची तब्बल १२ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि ६० कोटींपेक्षा जास्त रकमेची बेकायदेशीर वसुलीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (कलम १५६(३)) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी विजय तुकाराम रौंदळ (वय ५८, रा. बाणेर), अभी विजय रौंदळ (वय ३३, रा. बाणेर), देवेंद्र ललितकुमार शहा (रा. मुंढवा रोड, पुणे) आणि उमेहानी एम. दाभोईवाला (रा. नाशिक) या चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
नेमका प्रकार काय घडला?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०२४ पासून हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आरोपी विजय रौंदळ याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध सावकारी परवाना नसताना, त्याने वर्षाला ९ टक्के व्याजदराने प्रसिद्ध बांधकाम समूहाला १२ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या सुरक्षेसाठी कंपनीच्या मालकीची ६०८५.४० चौरस मीटर जमिनीची मालमत्ता दुय्यम निबंधक हवेली क्र. ११ यांच्या कार्यालयात साठेखत दस्त अन्वये लिहून देण्यात आली होती. मात्र, काही काळाने आरोपी विजय रौंदळ याने वकिलामार्फत नोटीस पाठवून दरमहा ४.१६ टक्के (म्हणजेच वार्षिक ४९.९२ टक्के) या प्रचंड व्याजदराने तब्बल ६० कोटी ७८ लाख रुपयांची बेकायदेशीर वसुलीचा प्रयत्न केला. ही रक्कम दिल्यानंतरच साठेखत रद्द करतो असे सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
त्यानंतर, कुलमुखत्यार पत्रात कोणतेही अधिकार नसताना, आरोपींनी संगनमत करून बनावट खरेदी दस्त आरोपी विजय रौंदळच्या नावाने नोंदवला आणि व्यवसायिकाची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने ‘लेटर ऑफ इंटेंट’ व ‘टर्म शीट’ तयार करून आरोपी देवेंद्र ललितकुमार शहा यांच्याकडून ३ कोटी रुपये स्वीकारले. या फसवणुकीप्रकरणी व्यवसायिकाने यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर बंडगार्डन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेयर करें