मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime News : हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी, मुंढवा येथील ५ सराईत गुन्हेगार तडीपार

परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त डॉ.

म
मुबारक

1 मिनट पठन

pune crime news

  • परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे
  • पुणे, दि. २७ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी : Pune Crime News

    Pune Crime News | पुणे शहर आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक पाऊले उचलली आहेत. आज परिमंडळ ५ हद्दीतील हडपसर, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी येथील ५ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत.

    सराईत आरोपी किशोर अमर सोळंकी (हडपसर), अक्षय अनिल पवार (हडपसर), कादिर उर्फ काजू आरिफ अन्सारी (कोंढवा), साहिल रफिक कलादगी (बिबवेवाडी), करण हरिदास जाधव (मुंढवा) यांच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

    सराईत गुन्हेगारांना पुणे शहर Pune Police, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

    हेही वाचा: Navi Mumbai News : पंचशील रियल्टीच्या ग्रॅमर्सी इन्फो पार्कने घणसोलीच्या MIDC परिसरात 615 कोटींची औद्योगिक जमीन घेतली

    शेयर करें