मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुण्यातील बाजारपेठेत हात की सफाई; मध्य प्रदेशमधील महिलांची आंतरराज्य टोळी गजाआड

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम पळवणाऱ्या मध्य प्रदेशातील सहा महिलांच्या आंतरराज्यीय टोळीचा लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पुण्यातील बाजारपेठेत हात की सफाई; मध्य प्रदेशमधील महिलांची आंतरराज्य टोळी गजाआड लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई
पुण्यातील बाजारपेठेत हात की सफाई; मध्य प्रदेशमधील महिलांची आंतरराज्य टोळी गजाआड लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

Pune News : लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम पळवणाऱ्या मध्य प्रदेशातील सहा महिलांच्या आंतरराज्यीय टोळीचा लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दहा मोबाईल फोन हस्तगत केले आहे. तसेच, पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील तब्बल सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

निशा शांतनू सिसोदीया (वय ३०, सध्या रा. आळंदी देवाची, पुणे; मूळ रा. कडिया गाव, ता. पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश), प्रिया आसिक सिसोदीया (वय ३४), पूनम प्रदिप सिसोदीया (वय २७), वर्षा कमल सिसोदीया (वय ३५), आसना रघुवीर सिसोदीया (वय ३२, तिघी रा. गुलखेडी, जि. राजगड, मध्य प्रदेश), सोनिका निरोत्तम सिसोदीया (वय ३७, रा. जाटखेडी, जि. राजगड, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी महिलांची माहिती मिळताच, २७ ऑगस्ट रोजी तपास पथकाने संगमवाडी येथील पार्किंग क्रमांक तीन येथे सापळा रचून वरिल सहा महिला आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीचे सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दहा मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांच्यासह लक्ष्मीनगर पोलिसांच्या तपास पथकाने केली आहे. सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रेय लिगाडे आणि पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

लक्ष्मीनगर पोलीस ठाणे २, विश्रामबाग पोलीस ठाणे २, विश्रांतवाडी पोलीस ठाणे १, लष्कर पोलीस ठाणे १ असे एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

शेयर करें