pune crime : आंदेकर टोळीतील तिघांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी; हल्ल्याच्या कटाचा तपास वेगात.
pune crime : आंदेकर टोळीतील तिघांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
2 मिनट पठन

pune crime : शस्त्रांचा पुरवठा, कटाचा सूत्रधार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी न्यायालयाचा आदेश
pune crime : वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूड घेण्यासाठी बालाजीनगर परिसरात कोयत्याने हल्ला आणि पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि हर्षल वाडेकर यांना पुण्यातील विशेष मकोका न्यायालयाने २६ जुलैपर्यंत, म्हणजेच पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यामागील कट, शस्त्रांचा पुरवठा आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची मागणी मान्य केली.(pune crime)

या प्रकरणात यापूर्वी अमन उर्फ लाला फारूख बागवाले, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषीप्रसाद आंबट आणि आफताब सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आंदेकर टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास मकोका अंतर्गत सुरू आहे.
सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींच्या घरांची झडती घेणे, गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कोठून आणले, त्यासाठी आर्थिक किंवा अन्य प्रकारची मदत कोणी केली, तसेच हल्ल्याचा कट कोठे आणि कोणाच्या उपस्थितीत रचण्यात आला, याचा तपास अद्याप बाकी आहे. आरोपींच्या मोबाईलमधील माहिती, परस्पर संपर्क आणि इतर पुरावे तपासणेही आवश्यक असल्याने पोलिस कोठडी देणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

Pune News : पानशेतच्या विस्थापितांचा ६६ वर्षांचा वनवास संपला
सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींच्या घरांची झडती घेणे, गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कोठून आणले, त्यासाठी आर्थिक किंवा अन्य प्रकारची मदत कोणी केली, तसेच हल्ल्याचा कट कोठे आणि कोणाच्या उपस्थितीत रचण्यात आला, याचा तपास अद्याप बाकी आहे. आरोपींच्या मोबाईलमधील माहिती, परस्पर संपर्क आणि इतर पुरावे तपासणेही आवश्यक असल्याने पोलिस कोठडी देणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला..(pune crime)

२० मे रोजी बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँक चौकात अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६) याच्यावर कोयत्याने वार करून त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस तपासानुसार, वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टोळीप्रमुख बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, तसेच कटामध्ये कोणाची नेमकी भूमिका होती, याचाही तपास सुरू आहे..(pune crime)
दरम्यान, बचाव पक्षाने आरोपींच्या घरांवर कारवाई झाल्याने आणि गुन्ह्यातील पिस्तूल आधीच जप्त झाल्याने तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता उरलेली नसल्याचा दावा केला. संबंधित तपास पूर्ण झाल्याचे सांगत आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तपासाच्या हिताचा विचार करून विशेष मकोका न्यायालयाने तिन्ही आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या काळात आरोपींकडून अधिक माहिती मिळवून गुन्ह्याच्या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यावर तपास यंत्रणांचा भर राहणार आहे..(pune crime)
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
