Pune Crime: सासवड येथील हॉटेलमध्ये अवैध हुक्का बार
एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
1 मिनट पठन

एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त https://maharashtramirror.com/
Pune Crime : पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून हुक्का बार चालविल्याचा प्रकार सासवड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कारवाई करत हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम, फिल्टर पाईप आणि रबरी पाईप असा एकूण 11 लाख 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास आस्करवाडी येथील हॉटेल बिलीयन्समध्ये करण्यात आली. या प्रकरणी अमर मुरलीधर वाडकर (वय 43, रा. आस्करवाडी, ता. पुरंदर) आणि संजय वग (वय 24, रा. आस्करवाडी, हॉटेल बिलीयन्स) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवून हुक्का बार चालवत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी 3 हजार रुपये किमतीचे दोन काचेचे हुक्का पॉट, 8 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे फ्लेवरयुक्त तंबाखूजन्य पदार्थ असलेले पाच डबे, 150 रुपये किमतीच्या तीन मातीच्या चिलीम, 50 रुपयांचे फिल्टर पाईपचे एक पॅकेट आणि 360 रुपये किमतीचे तीन रबरी पाईप असा मुद्देमाल जप्त केला. Pune Crime https://maharashtramirror.com/
या प्रकरणी पोलीस कर्मचारी तुषार वाळू लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 391/2026 अन्वये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार होळकर (बक्कल क्रमांक 1936) करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. Pune Crime
