मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : प्राण्यांची अवैध वाहतूक व विक्री प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद

Pune Crime : महापालिका कार्यालय परिसरातून गुन्हे शाखा युनिट-१ने घेतले ताब्यात

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

प्राण्यांची अवैध वाहतूक व विक्री प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद
महापालिका कार्यालय परिसरातून गुन्हे शाखा युनिट-१ने घेतले ताब्यात

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : प्राण्यांची अवैध वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने अटक केली. राजाभाऊ उर्फ राजेश दामोदर काची (वय ५६, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे महापालिका कार्यालय परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

फरासखाना पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९५१ मधील कलम ५(अ), ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि ११ नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राजाभाऊ काची हा पुणे महापालिका कार्यालयात आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकातील पोलीस अंमलदार विनोद चव्हाण यांना मिळाली.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना कळविण्यात आली. त्यांनी माहितीची खातरजमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक फौजदार भारत भोसले आणि पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, आशिष खरात व अतुल साळवी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली तेव्हा तेथे बातमीदाराने दिलेल्या वर्णनाशी जुळणारा इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता त्याने राजाभाऊ उर्फ राजेश दामोदर काची असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला २३ नोव्हेंबर रोजी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार भारत भोसले, पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, आशिष खरात आणि अतुल साळवी यांनी ही कारवाई केली.

https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper