Pune Crime : बाणेरमध्ये पादचाऱ्याला लुटले; सव्वालाखाचा ऐवज लंपास
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर पायी जाणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी आणि ब्रेसलेट हिसकावून, जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेतल्याची तक्रार बाणेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
1 मिनट पठन

Pune Crime : चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर पायी जाणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी आणि ब्रेसलेट हिसकावून, जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेतल्याची तक्रार बाणेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. चार अनोळखी आरोपींनी एकूण १ लाख २२ हजार ९९९ रुपयांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. १ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास कै. विठोबा बाळाजी मुरकुटे गार्डन परिसरात ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
बाणेरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते पायी जात असताना दुचाकीवरून आलेले चार अनोळखी आरोपी त्यांच्याजवळ थांबले. आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील ब्रेसलेट जबरीने घेतले. तसेच, त्यांना १८ हजार ९९९ रुपये ऑनलाइन हस्तांतरित करण्यास भाग पाडले. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर पुढील तपास करीत आहेत.
