Pune News : हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू; दहा किलोला ८०० ते १,००० रुपये दर
Pune News :पुणे : द्राक्षांचा नियमित हंगाम सुरू होण्यास अद्याप दीड महिन्याचा अवकाश असतानाच मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामपूर्व दिलखुश द्राक्षांची आवक सुरू झाली आहे.
1 मिनट पठन

Pune News :पुणे : द्राक्षांचा नियमित हंगाम सुरू होण्यास अद्याप दीड महिन्याचा अवकाश असतानाच मार्केटयार्डातील फळबाजारात हंगामपूर्व दिलखुश द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून दररोज सुमारे दोन टन द्राक्षे विक्रीसाठी दाखल होत आहेत. दर्जानुसार दहा किलोला ८०० ते १,००० रुपये दर मिळत असून, मर्यादित आवक आणि चांगली मागणी यामुळे दर टिकून आहेत, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिलीhttps://maharashtramirror.com/ Pune News
सध्या बाजारात येणाऱ्या द्राक्षांचा रंग पिवळसर असून, दर्जा आणि टिकण्याची क्षमता चांगली आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांकडून या द्राक्षांना पसंती मिळत आहे. यापूर्वी हंगामपूर्व द्राक्षांची आवक अत्यल्प प्रमाणात, एक ते दोन कॅरेट इतकीच होत होती. यंदा मात्र सुमारे दोन टन आवक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मोरे यांनी सांगितले.
द्राक्षांचा नियमित हंगाम साधारणतः नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होतो आणि एप्रिलअखेरपर्यंत चालतो. या काळात मार्केटयार्डात साधारणतः ६० ते ७० टन द्राक्षांची आवक होते. सध्या नवरात्रोत्सवातील उपवासामुळे तसेच पर्यटनस्थळांवरून मागणी वाढल्याने हंगामपूर्व द्राक्षांची विक्री चांगली होत आहे.
पुढील १५ दिवस हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियमित हंगामातील द्राक्षांची आवक वाढू लागेल. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांना ताजी द्राक्षे उपलब्ध झाली आहेत.
