मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; ‘महिला कनेक्शन’ समोर, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Mumbai News :मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; ‘महिला कनेक्शन’ समोर, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; ‘महिला कनेक्शन’ समोर, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Mumbai News :मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ‘महिला कनेक्शन’ समोर आले असून, पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही महिला हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पप्या शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या महिलांचा पूर्णेकर यांच्या हत्येशी नेमका काय संबंध आहे, तसेच त्या पप्या शिंदेच्या संपर्कात का होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हत्येपूर्वी किंवा हत्येनंतर या महिलांची भूमिका काय होती, याचीही चौकशी केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

महिलांचा पूर्णेकर यांच्याशीही संबंध होता का?
पोलिसांच्या तपासाचा एक महत्त्वाचा भाग या तिन्ही महिलांचा पूर्णेकर यांच्याशी काही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याभोवती फिरत आहे. त्यांचा पूर्णेकर यांच्याशी काही वाद झाला होता का, त्या पप्या शिंदेच्या संपर्कात कोणत्या कारणामुळे होत्या आणि हत्या प्रकरणाबाबत त्यांना काही माहिती होती का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

मात्र, या तिन्ही महिलांचा हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्यांच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.

राजकीय वळणामुळे प्रकरण चर्चेत
दरम्यान, या हत्याकांडाला आधीच राजकीय वळण मिळाले आहे. बुधवारी मध्यरात्री दाखल करण्यात आलेल्या पुरवणी FIRमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेविका तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या घडामोडीनंतर ठाण्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. आता तीन महिलांना ताब्यात घेतल्याने तपासाला आणखी एक नवी दिशा मिळाली आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून, ताब्यात घेतलेल्या महिलांची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें