मुख्य सामग्री पर जाएँ

Thane News : शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; 10 दिवसांपासून फरार असलेले दोन्ही मुख्य आरोपी प्रयागराजमधून जेरबंद!'

Thane News :ठाणे :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील मागील 10 दिवसांपासून फरार असलेले दोन मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली (41 वय) आणि अमित सिंह (34 वय) यांना ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून ताब्यात घेत

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; 10 दिवसांपासून फरार असलेले दोन्ही मुख्य आरोपी प्रयागराजमधून जेरबंद!'
शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; 10 दिवसांपासून फरार असलेले दोन्ही मुख्य आरोपी प्रयागराजमधून जेरबंद!'

Thane News :ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाची मोठी कारवाई; मुख्य आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंह उत्तर प्रदेशातून अटकेत'

Thane News :ठाणे :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील मागील 10 दिवसांपासून फरार असलेले दोन मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली (41 वय) आणि अमित सिंह (34 वय) यांना ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून ताब्यात घेतले आहे. संतोष कनोजिया हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याने, या कारवाईमुळे या गुन्ह्याच्या तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Thane News

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांची कारवाई

प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सुभाष शिंदे उर्फ पप्या, नितेश पवार आणि निखील यादव या तिघांना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी संतोष कनोजिया आणि त्याचा साथीदार अमित सिंह हे 10 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते. संतोषनेच या सर्व आरोपींना एकत्र आणले होते. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठाणे पोलिसांच्या पथकाने प्रयागराजमधील एका मंदिराच्या परिसरातून दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

आरोपींची पार्श्वभूमी आणि पुढील तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संतोष कनोजिया हा घोडबंदर येथील मानपाडा परिसरातील रहिवासी असून, याच भागात प्रदीप पूर्णेकर विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. तर दुसरा आरोपी अमित सिंह हा भाईंदर पूर्वमधील आझादनगर परिसरात वास्तव्यास आहे. व्यवसायाने संतोष हा धोबी तर अमित हा रिक्षाचालक असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे हत्येमागील नेमके कारण आणि इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें