मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पीएमपीएलला मिळाले अडीच कोटींचे उत्पन्न

एका दिवसात दोन कोटी एकावन्न लाख पंधरा हजार चौसष्ठ रुपयांचे विक्रमी उत्पन्न

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पीएमपीएलला मिळाले अडीच कोटींचे उत्पन्न
पीएमपीएलला मिळाले अडीच कोटींचे उत्पन्न

Pune News : ए का दिवसात दोन कोटी एकावन्न लाख पंधरा हजार चौसष्ठ रुपयांचे विक्रमी उत्पन्न

Pune News :पुणे, मिरर प्रतिनिधी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएल) सोमवारी (दि.१७) एका दिवसात दोन कोटी एकावन्न लाख पंधरा हजार चौसष्ठ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि सांघिक कामगिरीमुळे हे साध्य झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील सार्वजनिक बस वाहतूक देणारी सेवा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या ग्रामीण भागात शेकडो मार्गांवर पीएमपीएलच्या हजारो बसेस सुरू असतात. त्यामुळे नागरिकांना ते सोयीचे ठरते.पीएमपीएलने गेल्या अनेक दिवसांपासून चांगली सेवा देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या. बसमार्गांवर प्रवासी वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा परिणाम सोमवारी दिसला.पीएमपीएलकडून सोमवारी १७६७ बस विविध रस्त्यांवर धावत होत्या.पीएमपीएलच्या ६५३ बसपैकी ५२४ तर भाडेतत्तावरील १३८८ बसपैकी १२४३ बस प्रवासी सेवेत कार्यरत होत्या. दिवसभरात सुमारे साडेबारा लाख प्रवाशांनी पीएमपीएलच्या बसमधून प्रवास केला. उपलब्ध ताफ्यातील बसचा वापर करून प्रवाशांना जलद सेवा देण्यात आली. https://maharashtramirror.com/
उत्पन्नाचा सविस्तर तपशील
तिकीट रोख उत्पन्न १ कोटी ५९ लाख १६ हजार ४०३ रुपये. पासविक्री ५७ लाख २ हजार ७३० रुपये
मोबाईल अप ३३ लाख ५० हजार ९३१ रुपये
पुणे दर्शन व पर्यटन १ लाख ४५ हजार रुपये
पीएमपीएलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केलेल्या कामामुळे हे साध्य झाले आहे. शहराच्या विविध मार्गांवर नवीन बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यापुढेही नागरिकांना चांगली सेवा देण्यात येणार आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे हे शक्य झाले आहे. नागेश गायकवाड, जनसंपर्क अधिकारी पीएमपीएल

शेयर करें