PMPML News : पुणेकरांना विशष बसमधून मिळणार वर्षा सहलीचा आनंद
पुणे, महाराष्ट्र मिरर PMPML News: मुळशी आणि ताम्हिणी घाटातील हिरवाईने नटलेला निसर्ग आणि प्राचीन मंदिर स्थळांची सफर पुणेकरांना आता वातानूकुलित पीएमपीएमएल बसमधून अनुभवता येणार आहे.
2 मिनट पठन

पीएमपीएलची पर्यटकांसाठी खास सेवा; पाचशे रूपयांत करता येणार मुळशीची सफर
पुणे, महाराष्ट्र मिरर PMPML News: मुळशी आणि ताम्हिणी घाटातील हिरवाईने नटलेला निसर्ग आणि प्राचीन मंदिर स्थळांची सफर पुणेकरांना आता वातानूकुलित पीएमपीएमएल बसमधून अनुभवता येणार आहे. विशेषत: वीकेंडला होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पर्यटनाचा मनसोक्त आनंद देण्यासाठी पर्यटनप्रेमींना पुणे महानगर परिवहन महामंडळाने खास भेट दिली आहे. ‘विशेष पर्यटन बससेवा क्रमांक ९ अ’ या विशेष बसमधून पुणेकरांना पाचशे रूपयांमध्ये निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.PMPML News
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘वर्षा सहल’ या ‘विशेष पर्यटन बससेवा क्रमांक ९ अ’ सेवा सेवचे उद्घाटन स्वारगेट येथील बसस्थानकात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी पीएमपीएलचे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते.PMPML News

मंजुषा नागपुरे म्हणाल्या, पीएमपीएमएलचा उपक्रम पुणेकर आणि पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. सुरक्षित, किफायतशीर आणि नियोजनबद्ध पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. पुणे महापालिकेच्या सर्व महिला नगरसेविकांनी देखील या विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांच्यासाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात यावे,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.PMPML News
अजय खेडेकर यांनी महामंडळाच्या पर्यटन बस सेवेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच पीएमपीएमएलचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी पर्यटकांची गरज ओळखून पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार २९ जुलैपासून ही विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे.PMPML News
सध्या शहरात पीएमपीएलच्या एकूण तेरा पर्यटन मार्गांचे यशस्वी संचालन सुरू आहे. या मुळशी स्पेशल बससाठी पर्यटकांना आधीच बुकींग करता यावे, यासाठी शहरात आठ प्रमुख केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या पर्यटनस्थळाचा घेता येणार अनुभव
या विशेष बसचा प्रवास पुणे स्टेशन येथून सुरू होईल. त्यानंतर स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना मार्गे ही बस पर्यटकांना मुळशीतील एकापेक्षा एक निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाईल. या एकाच ट्रिपमध्ये प्रवाशांना मुळशी शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, टाटा मुळशी धरण आणि पळसे धबधब्याचा आनंद घेता येईल. त्यानंतर बस पुन्हा डेक्कन जिमखाना व स्वारगेटमार्गे बस पुणे स्टेशन येथे परत येईल.
येथे मिळेल तिकीट
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या ठिकाणी जाऊन तिकीट आरक्षित करता येईल.PMPML News
PMPML News
