मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तातडीने नव्या बसची गरज

Pune News : पुणे: पुणे शहरासह लगतच्या परिसरातील सार्वजनिक वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तातडीने नव्या बसची गरज आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तातडीने नव्या बसची गरज
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तातडीने नव्या बसची गरज

Pune News: : वाहतूक कोंडी आणि बसची टंचाईच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये संचालक मंडळाने नव्या बस खरेदीचा ठराव

Pune News : पुणे: पुणे शहरासह लगतच्या परिसरातील सार्वजनिक वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तातडीने नव्या बसची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमपीला ५०० नवीन बस खरेदी करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता.https://maharashtramirror.com/ Pune News

मात्र, निधी मिळून दीड वर्षाचा काळ उलटून गेल्यानंतरही तांत्रिक कारणे, अटी-शर्ती आणि सनदी प्रक्रियेच्या दिरंगाईमुळे ताफ्यात एकही नवीन बस दाखल झालेली नाही. त्यामुळे तिजोरीत निधी पडून असतानाही पुणेकरांना अपुऱ्या आणि जुनाट बसमधूनच प्रवास करावा लागत आहे.https://maharashtramirror.com/ pune News

२५ मार्च रोजी झाला होता निर्णय


पुण्यातील वाहतूक कोंडी आणि बसची टंचाई लक्षात घेता, २५ मार्च २०२५ रोजी झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या बस खरेदीचा ठराव मांडण्यात आला होता. याच बैठकीत पीएमआरडीएने बस खरेदीसाठी पीएमपीच्या बँक खात्यात २३० कोटी रुपये जमा केल्याची माहिती देण्यात आली होती. महापालिकेकडून एकूण १,००० नवीन बस खरेदी करण्याचे नियोजन असून, त्यापैकी ५०० बस पीएमआरडीएच्या निधीतून घेण्याचे ठरले होते. निधी खात्यात जमा होऊनही प्रत्यक्ष बस रस्त्यावर आणण्याच्या कामाला वेग मिळालेला नाही.

तांत्रिक फेरबदल आणि 'आयटीएमएस'चा अडसर


या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले की, बस खरेदीच्या मूळ मसुद्यात काही तांत्रिक त्रुटी होत्या. पूर्वीच्या ठरावात इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) म्हणजेच डिजिटल डिस्प्ले बोर्ड, लाईव्ह बस ट्रॅकिंग आणि स्मार्ट कम्युनिकेशन सिस्टीम या अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा समावेश केला गेला नव्हता. या सुविधेचा समावेश करण्यासाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागली आणि संचालक मंडळाची पुन्हा मंजुरी घ्यावी लागली. त्याचबरोबर, बस खरेदीनंतर त्यांची कार्यक्षमता चाचणी, विविध सुरक्षा पडताळणी, करार आणि करारातील अटींची फेरतपासणी यांसारख्या आवश्यक तांत्रिक टप्प्यांमुळे हा वेळ लागला आहे.

बँक खात्यात पैसे सुरक्षित; डिसेंबरअखेर ५०० बसचे आश्वासन


अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमआरडीएकडून प्राप्त झालेला २३० कोटी रुपयांचा निधी कुठेही वर्ग करण्यात आलेला नसून तो पीएमपीच्या अधिकृत बँक खात्यात सुरक्षित आहे. या रकमेवर मिळणाऱ्या व्याजासह अतिरिक्त खर्च होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सर्व तांत्रिक चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षाच्या डिसेंबरअखेर ५०० नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित ५०० बसही पुढील टप्प्यात लवकरच मिळतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

प्रवाशांमधून तीव्र संताप


दुसरीकडे, निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे बस खरेदी रखडल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत आणि पीएमपी प्रशासनामध्ये सेवा सुधारण्याची कोणतीही इच्छाशक्ती दिसत नाही, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकलेली ही खरेदी प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होते आणि पुणेकरांना दिलासा कधी मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महापालिकेकडून एकूण १,००० नवीन बस खरेदी करण्याचे नियोजन
त्यापैकी ५०० बस पीएमआरडीएच्या निधीतून घेण्याचे ठरले
निधी खात्यात जमा होऊनदीड वर्ष झाले तरी बस खरेदीला वेग नाही
बस खरेदीच्या मूळ मसुद्यात काही तांत्रिक त्रुटींमुळे विलंब

शेयर करें