PMC Water News : पुणेकरांच्या नशिबी अजून पंधरा दिवस गढूळच पाणी
पुणे, महाराष्ट्र निलेश राऊत : गढूळ पाण्याची समस्या ही दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला येतच असते.
2 मिनट पठन

जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक भार
महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग हतबल
वडगाव धायरी व खडकवासला येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणार
पाणी उकळून व तुरटी फिरूनच प्या
पुणे, महाराष्ट्र निलेश राऊत : गढूळ पाण्याची समस्या ही दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला येतच असते. यावर्षी मात्र, मे अखेरीस आणि जूनमध्ये हलकाही पाऊस झाला नाही. तर, जुलै च्या पहिल्या आठवड्यात एकदम मुसळधार पाऊस झाला. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर गाळ माती वाहून आली. परिणामी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याची गढूळता करणारी यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे आणखी पंधरा ते वीस दिवस तरी या गढूळ पाण्यापासून पुणेकरांची सुटका होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.PMC Water News

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी याबाबत महाराष्ट्र मिररने खास बातचीत केली. त्यावेळी त्यांनी अजून तरी किमान पंधरा दिवस गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावेच लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून, तुरटी फिरवून आणि उकळून प्यावे असे आवाहन केले आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून सर्व पेठांसह अर्ध्यापेक्षा अधिक पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. या केंद्रात दोन जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. यात एक प्रकल्प हा साठ वर्ष जुना आहे. त्याची मुळात क्षमता ही २५० एम एल डी पाणी शुद्ध करण्याची आहे, प्रत्यक्षात याठिकाणी ३५० एम एल डी पाणी शुद्धीकरण केले जाते. तर दुसरा म्हणजे नवा प्रकल्प हा ५०० एम एल डी क्षमतेचा आहे. या दोन्ही केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक भार सध्या त्यावर येत असल्याने अन्य जलशुद्धीकरण केंद्रापेंक्षा येथील पाण्यात गढूळपणा जास्त दिसून येत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.PMC Water News

खडकवासला धरणसाखळीतून शहराला पाणीपुरवठा होतो. धरणातून घेतले जाणारे पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शुद्ध केले जाते. मात्र, सध्या पाण्यातील गढूळपणाची पातळी वाढली आहे.
साधारणपणे पावसाळ्या व्यतिरिक्त पाण्याची गढूळता ही ४ ते ५ एन टी यु (नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट : गढूळता मोजण्याचे मापक) असते. ती पावसाळ्यात पहिल्या पावसात ८० एन टी यु इतकी जाते. खडकवासला धरणातून पाणी उचलल्यावर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते. त्यावेळी प्रत्यक्ष पाणी पुरवठा होताना पाण्यातील गढूळता ही पावसाळ्यात १ एन टी यु पर्यंत प्रारंभी राहते. परंतु यावर्षी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करताना आलेले दूषित पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने व अधिकचा भार आल्याने ती गढूळता ४ ते ५ एन टी यु इतकी आहे.
जुलै मध्येच जोरदार पाऊस झाल्याने, दरवर्षी प्रारंभीच्या थोडया का होईना झालेल्या पावसामुळे गवत व अन्य वनस्पती उगवतात. पण यंदा एकदम जोरदार पाऊस थेट जुलै महिन्यातच झाला आणि मोठ्या प्रमाणावर गाळ माती पाण्यासोबत येत राहिली. त्यामुळे ही गाळ माती खाली बसेपर्यंत धरणातून गढूळ पाणी येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणात माती वाहून येते. पाणी स्थिर होऊन माती खाली बसण्यासाठी काही दिवस जावे लागतात. आता मात्र, दररोज पाणी उचलावे लागते, अशा स्थितीत माती खाली बसण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी, पाण्याचा गढूळपणा वाढतो, असा दावा प्रशासनाने केला आहे.PMC Water News
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा भार कमी करणार - नंदकिशोर जगताप
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरील अतिरिक्त भार कमी केला जाणार आहे. वारजे येथील केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला येथे नवीन २०० एम एल डी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. तर वडगाव धायरी येथे १२५ एम एल डी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.PMC Water News
PMC Water News
