मुख्य सामग्री पर जाएँ

PMC NEWS : ड्रेनेजच्या पाण्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका

पुणे, महाराष्ट्र मिरर , PMC NEWS : शहरात पावसाळी आणि ड्रेनेज वाहिन्या स्वतंत्र असणे आवश्यक असताना अनेक भागांत पावसाळी वाहिन्या थेट ड्रेनेजला जोडल्या आहेत.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

PMC NEWS : ड्रेनेजच्या पाण्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका

पावसाळी वाहिन्यांचा भार ड्रेनेजवर आल्याने निर्माण होतोय धोका

पुणे, महाराष्ट्र मिरर , PMC NEWS : शहरात पावसाळी आणि ड्रेनेज वाहिन्या स्वतंत्र असणे आवश्यक असताना अनेक भागांत पावसाळी वाहिन्या थेट ड्रेनेजला जोडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये साचून आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. PMC NEWS

प्रामुख्याने दांडेकर पूल, कोंढवा, भवानी पेठ, शिवाजीनगर, जनवाडी, केळेवाडी, वारजे रामनगरसह कोथरूड, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, सिंहगड रस्ता, तसेच मध्यवर्ती पेठांमध्येही पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते. आता शहरात नवीन बांधकामे उभारताना पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आणि रस्त्यांच्या सुविधा दिल्या जातात. मोठ्या बांधकामांना परवानगी देताना काही मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. PMC NEWS

बांधकामातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का? ती व्यवस्था जवळच्या पावसाळी गटाराला किंवा नाल्याला अधिकृतपणे जोडलेली आहे का? संबंधित नाला अतिरिक्त पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे का? बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी पावसाळी जलनिचऱ्याची प्रत्यक्ष चाचणी केली जाते का, याबाबत कोणतेही उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. जमिनीखालील दोन्ही वाहिन्या पुन्हा स्वतंत्र करणे शक्य नसल्याने या समस्येचा सामना नागरिकांना वर्षानुवर्षे करावा लागत आहे. PMC NEWS

शहराचा आकार बशीसारखा असून, बहुतांश भाग सखल आहे, तसेच शहरात अनेक टेकड्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात टेकड्यांवरून पाणी सखल भागात येते. नाले, ओढे सुरू होतात, तेथे अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडून ते पाणी रस्त्यांवर साचते. त्यामुळे पालिकेने पावसाळी गटारांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. शहरात २,४०० किलोमीटर लांबीचे सहा मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर ३५८ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या असून त्यांचा निचरा थेट नदीपात्रात व्हायला हवा. PMC NEWS

नियोजनाचा अभाव, कामांवरील दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी त्या ड्रेनेजला जोडने पावसाचे पाणी, सांडपाणी एकत्र होते. हे जादा पाणी वाहून नेण्याची क्षमता ड्रेनेज वाहिन्यांमध्ये नसल्याने घाण पाणी रस्त्यावर, घरात येत आहे. PMC NEWS


शहरात अनेक भागांत ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्या एकत्र जोडल्या आहेत. त्या स्वतंत्र करण्यासाठी आराखडा केला जात आहेस तर काही भागांत कामेही सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सर्व संबधित विभागांना आयुक्तांच्या स्तरावर सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. PMC NEWS

दिनकर गोजारे
मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका

PMC NEWS

शेयर करें