मुख्य सामग्री पर जाएँ

PMC NEWS कोंढवा बुद्रुक, लोहगाव, कल्याणीनगर, वाघोलीमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC NEWS : कोंढवा बुद्रुक, लोहगाव कल्याणीनगर, वाघोली गट क्रमांक ७३८ या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने हातोडा मारला.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

PMC NEWS कोंढवा बुद्रुक, लोहगाव, कल्याणीनगर, वाघोलीमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे महापालिकेची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC NEWS : कोंढवा बुद्रुक, लोहगाव कल्याणीनगर, वाघोली गट क्रमांक ७३८ या परिसरातील
अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने हातोडा मारला. या परिसरातील तब्बल ४० हजार २२५ चौरस फूट अनधिकृत कच्ची / पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.PMC NEWS

अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली शुक्रवारी ( दि.१७) सकाळी आठ वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पुणे महापालिकेने पोलीस अधिकारी-१, पोलीस कर्मचारी-१२, एम.एस.एफ. जवान-७०, जॉ-कटर-१, जेसीबी-९, गॅसकटर-९, ब्रेकर-१४, बिगारी सेवक-५० यांच्या मदतीने केली.

यावेळी बांधकाम विकास विभागाकडील कनिष्ठ अभियंता रामदास कडू, अभिषेक कुसाळकर, सुशील मोहिते, पूजा नन्नवरे, सौरभ खरात, उप अभियंता वीरेंद्र टिळेकर, सपना सहारे, विवेक डुब्बेवार, इरफान शेख, बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष लांजेकर, तसेच अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची हे उपस्थित होते. सदर कारवाईत एकूण ४० हजार २२५ चौरस फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.PMC NEWS

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांनी जोपर्यंत पुणे महापालिकेचा डी.पी. मंजूर होत नाही, तोपर्यंत कोणीही बेकायदेशीर प्लॉटिंगमध्ये प्लॉट खरेदी करून त्यावर अनधिकृतपणे बांधकाम करू नये. तसे अनधिकृत बांधकाम आढळल्यास पुणे महापालिकेमार्फत कारवाई केली जाईल.

सोमनाथ बनकर, उपायुक्त पुणे महापालिका

PMC NEWS

शेयर करें