PMC News : अनधिकृत बांधकाम प्रकरणी दहा नगरसेवक रडारवर
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पुणे महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीनंतर जानेवारी महिन्यात निवडणुका पार पडल्या.
2 मिनट पठन

PMC News : नगरसेवक पद राहणार की जाणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC News : पुणे महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीनंतर जानेवारी महिन्यात निवडणुका पार पडल्या. ( pmc news ) पण यामध्ये निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी २४ नगरसेवकांविरुद्ध लघुवाद न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी दहा नवनिर्वाचित नगरसेवक रडारवर आले असून, त्यांच्याबाबतचा अहवाल महापालिकेच्या निवडणूक विभागाने अंतिम सुनावणी साठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला आहे. (pmc news corporators disqualification illegal construction)
दरम्यान या व्यतिरिक्त आणखी नऊ ते दहा नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामप्रकरणी थेट नगरसेवकपद रद्द करण्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली आहे.अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींमुळे ज्या नागरसेवकांची फाईल आयुक्त कार्यालयात प्राप्त झाली आहे त्यात भाजप, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नगरसेवक आहेत. यात व्यंकोजी खोपडे, वैशाली बनकर, सुरेखा कवडे, शीतल सावंत, काशिफ फखरूल हसन अली सय्यद, संगीता डांगत, रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे, प्राची आल्हाट, नंदा आबनावे यांचा समावेश आहे.( pmc news )
Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!
निवडणूक कार्यालयाचे प्रमुख प्रसाद काटकर यांनी महाराष्ट्र मिरर ला दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे काही नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारच्या अनुषंगाने चौकशी करून १० नगरसेवकांचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा महापालिका आयुक्त संबंधित विभागाकडे तपासणी करून व त्याबाबतच्या सूनवण्या घेऊन करतील. ( pmc news )
https://www.instagram.com/p/DacEfZINhQO
काही नगरसेवकांनी थेट अनधिकृत बांधकामे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. शहर अभियंता विभागाने या तक्रारींची चौकशी केली असता, संबंधित नगरसेवकांनी केलेल्या बांधकामांची महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी नसल्याची बाब समोर आली आहे. ( pmc news )
Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५ नगरसेवकांचे अहवाल अंतिम सुनावणीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यातील ४ नगरसेवकांची पहिली सुनावणी प्रक्रिया पार पडली असून, काहींनी पुढील वेळ मागून घेतली आहे. उर्वरित नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामाबाबत शहर अभियंता कडून अंतिम अहवाल मागवण्यात आला असून, तो येताच पुढील कार्यवाही केली जाईल.
कलम १० (ड) नुसार होणार कार्यवाही
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार, पूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्यास पद रद्द होत होते. मात्र, आता सुधारित कायद्यानुसार (कलम १० (ड), जर संबंधित नगरसेवकाने निवडून येण्यापूर्वी जरी अनधिकृत बांधकाम केले असेल, तरीही त्याचे पद रद्द करण्याची कडक तरतूद आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी आणि नंतर अनधिकृत बांधकाम आढळलेल्या या सर्व १० नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. ( pmc news )
