मुख्य सामग्री पर जाएँ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

व
विवेक

1 मिनट पठन

PM Narendra Modi

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

“भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनींना आणि देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र दिन हा यासाठी महत्वाचा आहे की भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. या महाराष्ट्राला असंच पुढे घेऊन जायचं आहे हा आमचा संकल्प आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा आमचा निर्धार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: IPS Deven Bharti : आयपीएस देवेन भारती यांनी मुंबई पोलिसांची सूत्रे स्वीकारली, म्हणाले- 'प्रत्येक नागरिकाला…'

शेयर करें