मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमापूर्वी बोगस पीएमओ अधिकाऱ्यासह 'बॉडीगार्ड' ताब्यात

Mumbai News : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पीएम मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट पीएमओ ओळखपत्र, बॉडीगार्डकडे बंदूक
पीएम मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट पीएमओ ओळखपत्र, बॉडीगार्डकडे बंदूक

Mumbai News : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एका व्यक्तीकडे पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र, तर त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव रोहन पारेख (वय २४) असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान त्याच्याकडे पीएमओ अधिकाऱ्याचे ओळखपत्र आढळले. प्राथमिक चौकशीत हे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डचीही तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडे बंदूक आढळली. https://maharashtramirror.com/ Mumbai news
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागे नेमका काय उद्देश होता, तसेच बंदूक बाळगण्याचे कारण काय होते, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू असल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ mumbai news
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, (दि.८) रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजता, मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२६च्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये डिजिटल पेमेंट, वित्तीय समावेशन आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. एजंटिक एआय, प्रोग्रामेबल फायनान्स आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा सुरक्षित व सर्वसमावेशक वापर यांसारख्या विषयांवर परिषदेत चर्चा अपेक्षित आहे. अशातच कार्यक्रमस्थळावर बनावट पीएमओ ओळखपत्र आणि बंदूक आढळल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शेयर करें