Pune crime : तरूणीला ब्लॅकमेल करून ९७ लाख उकळले
Pune crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी येथील अशोक थिएटर परिसरात ब्लॅकमेल करत एका तरुणीकडून तब्बल ९७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने उकळल्याची घटना फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडली.
1 मिनट पठन

Pune crime : पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune crime: पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी येथील अशोक थिएटर परिसरात ब्लॅकमेल करत एका तरुणीकडून तब्बल ९७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने उकळल्याची घटना फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
भावेश प्रदिप लखवाणी (वय २५, रा. पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रिती दिलीप तारानी (वय २४, रा. पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ pune crime
आरोपीने फिर्यादीला फोन करून जबरदस्तीने अशोक थिएटर परिसरात बोलावून घेतले. एकत्र असलेले फोटो कुटुंबाला दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून वेळोवळी ९७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बळकावले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
