मुख्य सामग्री पर जाएँ

Pimpri Crime : १० लाखांची फसवणूक करणारा बँक खातेधारक गळाला

Pimpri News :पिंपरी: सायबर गुन्हेगारांना स्वतःचे बँक खाते वापरू देऊन फसवणुकीच्या रक्कमकाढणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

१० लाखांची फसवणूक करणारा बँक खातेधारक गळाला स्वतःचे बँक खाते दिले सायबर भामट्यांना भाड्याने
१० लाखांची फसवणूक करणारा बँक खातेधारक गळाला स्वतःचे बँक खाते दिले सायबर भामट्यांना भाड्याने

Pimpri Crime : स्वतःचे बँक खाते दिले सायबर भामट्यांना भाड्याने

Pimpri News :पिंपरी: सायबर गुन्हेगारांना स्वतःचे बँक खाते वापरू देऊन फसवणुकीच्या रक्कमकाढणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली. ही घटना १८ जुलै ते २२ जुलै दरम्यान घडली.https://maharashtramirror.com/ Pimpri News

तुषार अमराराम चौधरी (रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव वाघमारे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने स्वतःच्या नावावर इंडसइंड बँकेत खाते उघडून देशभरातील फसवणुकीच्या तक्रारींमधील १० लाख ७० हजार रुपये त्या खात्यावर मागवले. त्यानंतर ती रक्कम चेकद्वारे काढून घेऊन नागरिकांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें