Pimpri Crime News : भरधाव ट्रकची स्कूटीला धडक; चिमूकली ठार
भांबोली गावातील घटना
1 मिनट पठन
भांबोली गावातील घटना
पिंपरी, महाराष्ट्र मिरर : एक भरधाव ट्रकने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दहा वर्षांच्या चिमूकलीचा मृत्यू झाल्याची घटना भांबोली गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सृष्टी रोहितकुमार रावत असे मयत मुलीचे नाव आहे.
ट्रक चालक विष्णू नरसिंगराव देशमुख (वय ५२, रा. सारणी सांगवी, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सीमा सुदाम पुराम (वय २४, रा. ठाकरवाडी, सावरदरी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा या बुधवारी (दि.१७ जून) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेजारी राहणाऱ्या सृष्टी रावत या मुलीला आपल्या ज्युपिटर स्कुटीवर बसवून घरी जात होत्या. त्यावेळी भांबोली गावच्या हद्दीत संत तुकाराम सर्कल येथे तळेगाव एमआयडीसीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा यांच्या हाताला व कानाला गंभीर दुखापत झाली, तर सृष्टी गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. उत्तर महाळुंगे पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.
Speeding Truck Hits Scooter
