मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : पिंपरी चिंचवडमध्ये वाढतोय स्वाइन फ्ल्यूचा धोका

Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, ऑगस्ट महिन्यातच २३ रुग्णांची नोंद झाली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पिंपरी चिंचवडमध्ये वाढतोय स्वाइन फ्ल्यूचा धोका
पिंपरी चिंचवडमध्ये वाढतोय स्वाइन फ्ल्यूचा धोका

Pune News : महिनाभरात २३ रुग्ण; नव्याने चार पॉझिटिव्ह

Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, ऑगस्ट महिन्यातच २३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे एकूण २९ रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिका वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जुलैमध्ये स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होत २३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.https://maharashtramirror.com/ Pune News

शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, खोकताना-शिंकताना नाक-तोंड झाकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे, असे आवाहन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

स्वाइन फ्लू हा श्वसनमार्गाशी संबंधित संसर्गजन्य आजार असून, एच १ एन १ विषाणूमुळे त्याची लागण होते. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी आणि अतिशय थकवा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये न्यूमोनियासाखी देखील लक्षणे आढळतात.

शेयर करें