Pune News : पोलिस कर्मचारी विजय कोळी याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
Pune News : पुणे : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या विजय कोळी या पोलिस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या विजय कोळी या पोलिस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणारे विजय कोळी कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. विजय हे जाताना सरकारी पिस्तुल घेऊन गेल्याने संपूर्ण पोलिस दल त्यांचा शोध घेत होते. कोळी निगडी दुर्गा देवी टेकडी परिसरात शेवटचे दिसल्याने त्यांचा ड्रोन च्या साहाय्याने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज अखेर सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. सरकारी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून कोळी यांनी आत्महत्या केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी RTPC म्हणून नियुक्तीला होते.https://maharashtramirror.com/ Pune News
