Pimpari News : पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीतील डॉल्बीवर कारवाई ;१६ साउंड सिस्टिम जप्त
Pimpari News : पिंपरी: सार्वजनिक दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजविणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली.
1 मिनट पठन

Pimpari News : निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याने पोलिसांची कारवाई

Pimpari News : पिंपरी: सार्वजनिक दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजविणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत १६ डॉल्बी स्पीकर, अॅम्प्लीफायर, मिक्सर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari News
सार्वजनिक दहीहंडी उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. निगडी, पिंपरी, संत तुकारामनगर, दापोडी, हिंजवडी, बावधन, वाकड, काळेवाडी, भोसरी, दिघी आणि चाकण दक्षिण आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pimpari News
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित डॉल्बी सिस्टीमवर तात्काळ कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत १६ डॉल्बी स्पीकर, अॅम्प्लीफायर, मिक्सर आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Pimpari News
कोट
"सार्वजनिक उत्सव साजरे करताना नागरिकांनी ध्वनीविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक शांतता आणि पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन ध्वनिवर्धक यंत्रणेचा मर्यादित व नियमबद्ध वापर करावा. निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाईल." - धीरज पाटील, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा
