Pimpari crime: विद्युत डीपीतील तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त
Pimpari crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर: ग्रामीण भागातील विद्युत डीपीमधील तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचापिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने पर्दाफाश केला.
1 मिनट पठन

Pimpari crime: चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ची कामगिरी
Pimpari crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर: ग्रामीण भागातील विद्युत डीपीमधील तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचापिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून , एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी १६ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari crime
अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४, रा. भानोबाची कोयाळी, ता. खेड), राहूल दिनकर पोकळे (वय २०, रा. भानोबाची कोयाळी, ता. खेड), ईजहार ईस्माइल चौधरी (वय ४०, भंगार विक्रेता, मुळ रा. उत्तर प्रदेश), ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०, भंगार विक्रेता, रा. मरकळ, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, फरार आरोपी ललीत मगर उर्फ नेपाळ्या याचा शोध सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari crime
आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद या ग्रामीण भागांतून विद्युत डीपीतील तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिल आरोपींना भानोबाची कोयाळी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चारचाकी अशी तीन वाहने असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pimpari crime
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे व बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.https://maharashtramirror.com/ Pimpari crime
एकूण सात गुन्हे उघडकीस
या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्यातल चार आणि दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत चोरीचा सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे.
