मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : पिंपरीत वर्चस्वाच्या वादातून तरुणावर पालघनने हल्ला

Pune Crime :पिंपरी: नाक्यावर थांबण्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणावर पालघन, लोखंडी फायटर व दगडाने हल्ला केला.

वक
विक्रांत कुलकर्णी

4 मिनट पठन

पिंपरीत वर्चस्वाच्या वादातून तरुणावर पालघनने हल्ला
पिंपरीत वर्चस्वाच्या वादातून तरुणावर पालघनने हल्ला

Pune Crime :पिंपरी: नाक्यावर थांबण्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणावर पालघन, लोखंडी फायटर व दगडाने हल्ला केला. ही घटना पिंपरीतील भाटनगर येथे २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

कार्तीक उर्फ लखन कैलास साठे (वय २४), गणेश साठे (वय २६), एक विधीसंघर्षीत बालक (सर्व रा. पिंपरी) आणि सुजीत (रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय बाबु पांढरे (वय २६, रा. पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी मित्रांसोबत थांबले असताना आरोपींनी "हा नाका आमचा आहे" म्हणत वाद घातला. कार्तीक साठेने डोक्यात पालघन मारली, विधीसंघर्षीत बालकाने फायटरने मारहाण केली तर सुजीतने दगड फेकून मारला. यानंतर आरोपींनी पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

काळेवाडीत जुन्या भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी: फोनवरील जुन्या वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका तरुणाला अडवून कोयत्याने डोक्यात वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काळेवाडीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

अक्षय उर्फ गोट्या छत्री (रा. पिंपरी), कृष्णा सोनवणे (रा. रहाटणी) आणि शकलीन शेख (रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आकाश दत्ता पवार (वय २३, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादी पायी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. "कॉलनीत फक्त मी भाई आहे" असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कृष्णा सोनवणे याने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले आणि कोयता हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

​पिंपरीत साडेतीन लाखांची घरफोडी ​

पिंपरी: बंद घरातील कपाटाचे लॉकर तोडून सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा ३ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी पिंपरीत घडली..https://maharashtramirror.com/ Pune Crime

या प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील सोन्याची चैन, परफ्युम आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

​सोन्याचे बिस्कीट घेऊन भोसरीतील सराफाची फसवणूक

पिंपरी: सोन्याचे बिस्कीट खरेदी करून सायबर तक्रारीमधील संशयास्पद खात्यातून पैसे पाठवत सराफ दुकानदाराची एक लाख ९४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना भोसरीतील श्री अंबिका ज्वेलर्समध्ये घडली..https://maharashtramirror.com/ Pune Crime

संकेत दादासाहेब नागरे (वय २१, रा. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राकेश शेसमल जैन (वय ४३, रा. भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपीने दुकानातून १५ ग्रॅम सोन्याचे बिस्कीट घेतले. पेमेंट करण्यासाठी भावाकडून पैसे पाठवतो असे सांगून एकूण २ लाख ३२ हजार पाठवले. त्यापैकी सायबर तक्रारीतील १ लाख ९४ हजार रुपयांची वादग्रस्त रक्कम खात्यात वळवून दुकानदाराची फसवणूक केली. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

पिंपळे निलख येथे ​तिकीट बुकिंगच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक

पिंपरी: स्वस्तात प्रवास तिकीट बुक करून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची १ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला आहे..https://maharashtramirror.com/ Pune Crime

या प्रकरणात अज्ञात मोबाइल धारक, बँक खातेदार आणि फेसबुक प्रोफाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित लखपतराय गुप्ता (वय ४६, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तिकीट बुकिंगच्या नावाखाली यूपीआय आणि आयएमपीएसद्वारे फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख २० हजार रुपये वर्ग करून घेतले आणि तिकीट न देता फसवणूक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

भोसरीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी: पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका अनोळखी तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिल्‍याने मृत्‍यू झाला. ही घटना भोसरी येथे घडली.
​या प्रकरणी अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस शिपाई सचिन शिवाजी माने (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. प्रितम हाऊस समोर एका भरधाव अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत अंदाजे ३५ वर्षीय पादचाऱ्याला जोरात उडविल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

दोन गावठी पिस्तूलसह तरुण गजाआड

पिंपरी: बेकायदेशीररीत्या दोन देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शेलू येथे केली.
आकाश अंकुश देवकर (वय २७, रा. शिंदेगाव, ता. खेड) याला अटक केली असून गणेश राजू काळे (वय २७, रा. वडगाव मावळ) याचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस हवालदार अंजनराव शंकरराव सोडगीर यांनी फिर्याद दिली आहे. पडवळवस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपीकडून २ गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली. हे शस्त्र त्याने काळेकडून घेतल्याचे सांगितले. पुढील तपास उत्तर म्हाळुंगे पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

निगडीत कोयत्यासह तरुण अटकेत

पिंपरी: पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोयता घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील स्मशानभूमीजवळ करण्‍यात आली.

साहिल संजय शिंदे (वय २५, रा. चिखली) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे यांनी फिर्याद दिली आहे. ओटास्कीम येथील रस्त्यावर आरोपी संशयितरीत्या फिरताना आढळला. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कोयता मिळून आला. शहरात सध्या शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई असताना त्याने आदेशाचा भंग केला. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

----------------------------------------------------+

दहशतीसाठी कोयता बाळगणाऱ्यास अटक

पिंपरी: दहशत माजविण्याच्या उद्देशाने कोयता जवळ बाळगणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई निगडीतील ओटास्कीम परिसरात केली.
​सागर रंगनाथ पोटभरे (वय २५, रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलीस शिपाई किशोर दगडू घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. स्मशानभूमीजवळ आरोपी सागर पोटभरे हा कोयता बाळगून फिरत होता. पोलिसांनी झडती घेऊन शस्त्र जप्त करत त्याला अटक केली. पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें