Pune Crime : पिंपळे गुरव येथे तरुणाची ४० लाखांची फसवणूक
Pune Crime : पिंपरी: पिंपळे गुरव येथे बांधकामात ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
1 मिनट पठन

Pune Crime : बांधकामात नफ्याचे आमिष दाखवले; दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल
Pune Crime : पिंपरी: पिंपळे गुरव येथे बांधकामात ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २०२१ पासून ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोरया पार्क, पिंपळे गुरव येथे घडली. याबाबत रॉबीन सुनिल मालाकर (४३, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपळे गुरव आणि येरवडा येथील दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला जमिनीच्या विकसनातून ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने संबंधित जागेवरील बांधकामावर ४० लाख रुपये खर्च केले. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कराराप्रमाणे मिळणारे ९० लाख रुपये न देता आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
