मुख्य सामग्री पर जाएँ

PCMC NEWS : तळेगाव दाभाडे येथे पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू

रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकीची धडक

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PCMC NEWS : तळेगाव दाभाडे येथे पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू

रस्ता ओलांडताना अज्ञात दुचाकीची धडक

पिंपरी, PCMC NEWS: रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात मोटारसायकल चालकाने पादचाऱ्याला जोरात धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२८ जून) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे, मावळ येथे घडली.PCMC NEWS

या प्रकरणात नरेंद्र रघुनाथ जोशी (५८, रा. पिंपरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.PCMC NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे रोड क्रॉस करत होता. त्यावेळी एका अज्ञात मोटारसायकल चालकाने आपले वाहन हयगयीने, अविचाराने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवले. त्याने फिर्यादीच्या भावाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

PCMC NEWS

शेयर करें