मुख्य सामग्री पर जाएँ

PCMC NEWS : चिखलीत भंगार सामानाच्या दुकानाला भीषण आग

मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर ज्वलनशील वस्तू जळून परिसरात पसरला दाट काळा धूर

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PCMC NEWS : चिखलीत भंगार सामानाच्या दुकानाला भीषण आग

मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर ज्वलनशील वस्तू जळून परिसरात पसरला दाट काळा धूर

पिंपरी PCMC NEWS: चिखलीतील जाधववाडी परिसरात असलेल्या एका भंगार सामानाच्या दुकानाला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. विष्णू ग्रीन सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या दुकानांसह आसपासच्या परिसरात आग वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.PCMC NEWS

आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.PCMC NEWS

या आगीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर ज्वलनशील वस्तू जळाल्याने परिसरात दाट काळा धूर पसरला असून तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

PCMC NEWS

शेयर करें