मुख्य सामग्री पर जाएँ

PCMC News: चार्जिंगला लावलेल्या ई-स्कूटरला भीषण आग; तीन दुचाकी खाक, एक जण जखमी

PCMC News : पिंपरी-चिंचवडमधील वळेकरवाडी (दगडोबा चौक) येथे सोमवारी सकाळी इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगदरम्यान लागलेल्या भीषण आगीत तीन ई-स्कूटर जळून खाक झाल्या.

धओ
धनश्री ओटारी

1 मिनट पठन

PCMC News

PCMC News : इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगदरम्यान लागलेल्या भीषण आगीत तीन ई-स्कूटर जळून खाक झाल्या.

PCMC News : पिंपरी-चिंचवडमधील वळेकरवाडी (दगडोबा चौक) येथे सोमवारी सकाळी इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगदरम्यान लागलेल्या भीषण आगीत तीन ई-स्कूटर जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून, इमारतीचेही नुकसान झाले आहे. PCMC News e scooter fire one injured

सोमवारी सकाळी ७:१८ च्या सुमारास ही घटना घडली. वळेकरवाडीतील एका तळमजला अधिक दोन मजले असलेल्या निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये काही इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगला लावल्या होत्या. दरम्यान, एका दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणांतच शेजारी उभ्या असलेल्या तीन ई-स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही आग वेगाने पसरत इमारतीपर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. PCMC News

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी शहाजी कोपनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीने इमारतीला वेढा घातल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अग्निशमन जवानांनी वेळीच धाव घेऊन इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जलद कामगिरीमुळे आगीचा धोका टळला आणि इमारतीचे मोठे नुकसान झाले नाही.

अग्निशमन अधिकारी शहाजी कोपनकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी चार्जिंगला लावलेली असतानाच ही आग लागली असावी, असा संशय आहे. मात्र, शॉर्ट सर्किट झाले की बॅटरीमध्ये बिघाड झाला, हे स्पष्ट करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. PCMC News

Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाची मुदत पुन्हा लांबणीवर

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर, निवासी इमारतींच्या पार्किंगमध्ये चार्जिंग करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

शेयर करें