मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे

Mumbai News : मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे

Mumbai News : पंजाबराव डख यांचा नवा अंदाज; ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान विदर्भ-मराठवाड्यात पावसाच्या सरींची शक्यता


Mumbai News : मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे. अशातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील आगामी पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, ७, ८ आणि ९ सप्टेंबरदरम्यान राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. काही भागांत कडक ऊनही पाहायला मिळू शकते. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे गायब होणार नसल्याचे डख यांनी म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, परतीच्या पावसाकडूनही शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस न झालेल्या भागांना परतीचा पाऊस दिलासा देऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पावसाची स्थिती आगामी काळात शेतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी १३ सप्टेंबरपर्यंत शेतीतील प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत, त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळातही राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, भारतीय हवामान विभागानेही देशातील अनेक भागांत आगामी २४ तासांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवणे आणि त्यानुसार शेतीची कामे नियोजित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेयर करें