मुख्य सामग्री पर जाएँ

Chatrapati Sambhajinager : पैठणमध्ये एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात एसटी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पैठणमध्ये एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू
पैठणमध्ये एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; कापड दुकानासमोर घडला भीषण अपघात

Chatrapati Sambhajinager : छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात एसटी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शहरातील एका कापड दुकानासमोर हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये बाप-लेकीचा समावेश असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात कृष्णा अशोक गायकवाड (वय २५), त्यांची पाच वर्षांची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड आणि अशोक गणेश भालेराव यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पैठण पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager

नेमका कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे सख्खे साडू आहेत. दोघेही पाच वर्षांच्या छकुलीसह दुचाकीवरून पैठणहून आगरनांदरच्या दिशेने निघाले होते.https://maharashtramirror.com/ Chatrapati Sambhajinager

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक २ ची एसटी बस (क्रमांक एमएच ०६, बीएल ४३६९) पैठण शहरातून जात होती. शहरातील एका कापड दुकानासमोर बसने त्यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच २०, जीए २९७९) पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त एसटी बस ताब्यात घेण्यात आली असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पैठण परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें