मुख्य सामग्री पर जाएँ

ओव्हरहेड केबलचे जाळे टप्प्याटप्प्याने भूमिगत करावे : ओमप्रकाश दिवटे

सदर कामासाठी मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP) तयार करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

ओव्हरहेड केबलचे जाळे टप्प्याटप्प्याने भूमिगत करावे : ओमप्रकाश दिवटे

सदर कामासाठी मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP) तयार करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

निलेश राऊत
पुणे: नागरिकांना अडथळा, अपघात होणार नाही तसेच शहराचे सौंदर्यीकरणास अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने ओव्हरहेड केबल्सचे व्यवस्थापन करण्यात यावे. अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे महापालिका क्षेत्रातील ओव्हरहेड केबलचे जाळे शिस्तबद्ध करून, टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यासाठी मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP) करण्यासाठी मंगळवारी दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

ओव्हरहेड केबल कोणत्या पद्धतीने टाकणे व त्यासाठी आवश्यक परवानग्या
सदर बैठकीमध्ये पुणे शहरात कोणत्या प्रकारच्या ओव्हरहेड केबल टाकण्यात येतात याविषयी विस्तृत चर्चा झाली. टेलीकम्युनिकेशन अॅक्टनुसार तसेच पॉलीसीनुसार पुणे मनपाकडून ओव्हरहेड केबल कोणत्या पद्धतीने टाकणे व त्यासाठी आवश्यक परवानग्या देणे याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्देश व सूचना देण्यात आल्या.

ओव्हरहेड केबल्सबाबत यापूर्वी केलेले सर्वेक्षण विचारात घेऊन शहरातील उर्वरित सर्वेक्षण न केलेल्या भागांचे सर्वेक्षण करण्यात यावे. हैदराबाद शहराच्या उदाहरणाप्रमाणे पुणे शहरातील ओव्हरहेड केबलसाठी असणारी उंचीची मर्यादा, ओव्हरहेड केबल ओढण्यासाठी स्वतंत्र पोल उभारणी करायची असल्यास त्यानुसार भाडे दर आकारणी प्रस्ताव तयार करावा. पथ विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी भूमिगत डक्ट मार्फतच केबलिंग करण्याची तरतूद करावी.

केबल सुविधा पुरविणारे अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे व परवानगी प्रक्रिया देण्याबाबत संगणक प्रणाली वापरावी. ऑनलाईन पोर्टलद्वारे मंजुरी प्रक्रिया कार्यवाही होईपर्यंत एक खिडकी योजनेद्वारे मंजुरीची कार्यवाही मुदतीत करावी. मनपाकडून तसेच सर्व शासकीय विभागाकडून उदा. पोलीस, वाहतूक पोलीस, MSEDCL, MNGL इ. विभागांमार्फत याकामी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याद्वारे प्रक्रियेवर देखरेख ठेवणेची व्यवस्था करावी.

सध्या शहरामध्ये अधिकृत परवानगीशिवाय केबलचे जाळे विस्तारलेले आहे. त्याचे नियमन करण्यासाठी सर्व संस्थांचे लोकप्रतिनिधी व संबंधित असोसिएशननी केलेल्या सूचनांवर विचार विनिमय होऊन तसेच पॉलीसीमधील तरतुदीनुसार अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्यात यावी. पालखी मार्गाबाबत संबंधित केबल चालकांसोबत झालेल्या चर्चेनुसार सध्या पुणे शहरात असलेल्या विविध ओव्हरहेड केबल्स प्राधान्याने काढण्यात याव्यात.

या चर्चेनुसार ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्यासाठी विविध मुद्यांचा समावेश करून अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ड्राफ्ट महापालिका आयुक्तांकडे लवकरात लवकर सादर करण्यात यावा असे निर्देश यावेळी दिवटे यांनी दिले.

बैठकीस मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (पथ)राजेश बनकर तसेच आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Overhead cable network should be moved underground in phases: Omprakash Divate

शेयर करें