मुख्य सामग्री पर जाएँ

बारा रुपयांचे थकीत गॅस बिल, गमावले दीड लाख

गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून अज्ञात सायबर चोरट्याने लुटले

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

बारा रुपयांचे थकीत गॅस बिल, गमावले दीड लाख

गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून अज्ञात सायबर चोरट्याने लुटले

पिंपरी: अवघ्‍या बारा रुपयांसाठी गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून अज्ञात सायबर चोरट्याने चिखली येथील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ५८ हजार ८०० रुपये लंपास केले. ही घटना चिखलीतील नेवाळे वस्ती येथे ६ मे २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पुरुष फिर्यादीने यासंदर्भात मंगळवारी (दि. १२ मे) रोजी चिखली पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला 'तुमचे १२ रुपयांचे एमएनजीएल गॅस बिल थकीत असून पेमेंट न केल्यास कनेक्शन कट होईल' असा खोटा मेसेज पाठवला होता. फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवून आरोपीने पाठवलेली 'बीआयएन एमएनजीएल बिल अपडेट' नावाची फाईल डाऊनलोड केली. या ॲपमध्ये थकीत १२ रुपये भरण्यासाठी फिर्यादीने क्रेडिट कार्डची माहिती भरली असता, आरोपीने त्यांचा फोन हॅक केला. त्यानंतर त्यांच्या साऊथ इंडियन बँकेच्या क्रेडिट कार्डमधून चार वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण एक लाख ५८ हजार ८०० रुपये परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली.

चिखली पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें