Pune News : खासदार ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता ओसरली
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सतत चर्चेत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
1 मिनट पठन

३५ हजार फॉलोअर्स झाले कमी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सतत चर्चेत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासह इतर पाच खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. आता त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्सच्या संख्येत तब्बल ३५ हजारांची घट झाल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.https://maharashtramirror.com/
ओमराजे निंबाळकर हे आपल्या आक्रमक राजकीय भूमिकेसाठी आणि विविध प्रश्नांवर थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. मतदारसंघातील विकासकामे, शेतकरी प्रश्न तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवर ते सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडत असतात. त्यांच्या पोस्ट आणि व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असतो. मात्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी घट होताना दिसतंय. अलीकडे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तब्बल ३५ हजार लोकांनी अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अनफॉलो करणारे खासदार ओमराजे जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना मात्र फॉलो करतात. त्यांनी पक्ष सोडला पण आपली मैत्री कायम ठेवली आहे. आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची मैत्री तर सर्वत्र चर्चेत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
ओमराजे निंबाळकर यांनी वडिलांच्या खूनप्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागावा, याकरिताच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने हा निकाल लागला नाही. पुराव्याअभावी आरोपींची सुटका करण्यात आली.
