मुख्य सामग्री पर जाएँ

America News : अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ, जर्मनीचे पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल यांच्या 'ऑप्टोजेनेटिक्स' संशोधनाला वैद्यकशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार

America News : स्टॉकहोम: वैद्यकशास्त्रातील २०२६ या वर्षाचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचा आणि गुपितांचा उलगडा करणाऱ्या तीन वैज्ञानिकांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ, जर्मनीचे पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल यांच्या 'ऑप्टोजेनेटिक्स' संशोधनाला वैद्यकशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार
अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ, जर्मनीचे पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल यांच्या 'ऑप्टोजेनेटिक्स' संशोधनाला वैद्यकशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार

America News : स्टॉकहोम: वैद्यकशास्त्रातील २०२६ या वर्षाचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचा आणि गुपितांचा उलगडा करणाऱ्या तीन वैज्ञानिकांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ आणि जर्मनीचे पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल या तीन शास्त्रज्ञांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 'लाइट-गेगेड आयन चॅनेल्स' आणि 'ऑप्टोजेनेटिक्स' क्षेत्रातील त्यांच्या क्रांतीकारी शोधांसाठी हा सन्मान देण्यात येत असल्याचे स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल समितीने सोमवारी घोषित केले.https://maharashtramirror.com/ America News

'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, या तीनही वैज्ञानिकांनी प्रकाशाचा वापर करून जिवंत मेंदूतील विशिष्ट चेतापेशींचे नियंत्रण करण्याची एक अनोखी आणि प्रगत तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. या संशोधनामुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य कधीही सुरू किंवा बंद करणे शक्य झाले आहे. यामुळे मानवी भावना, विचार, स्मृती आणि वर्तनामागील मज्जासंस्थेचे जाळे कसे काम करते, हे समजून घेणे वैज्ञानिकांना शक्य झाले आहे.https://maharashtramirror.com/ America News

पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांनी शेवाळामध्ये आढळणाऱ्या अशा प्रथिनांचा शोध लावला, जे प्रकाशाला प्रतिसाद देऊन आयन्सचा प्रवाह नियंत्रित करतात. यानंतर कार्ल डायसेरोथ यांनी या तंत्राचा उपयोग प्राण्यांच्या मेंदूतील पेशींचे कार्य थेट प्रकाशाच्या सहाय्याने नियंत्रित करण्यासाठी केला. या संयुक्त संशोधनातूनच 'ऑप्टोजेनेटिक्स' या नव्या संशोधन क्षेत्राचा जन्म झाला.

पार्किन्सन्स, नैराश्य, चिंता आणि दृष्टिहीनतेसारख्या मेंदूशी संबंधित आजारांवर प्रभावी उपचार शोधण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या पुरस्काराचे स्वरूप १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे ९ लाख पौंड / १० कोटी रुपयांपेक्षा जास्त) असून ही रक्कम तिन्ही विजेत्यांमध्ये समान विभागून दिली जाईल. हे वैद्यकशास्त्रातील ११७ वे नोबेल पारितोषिक आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें