मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : मोक्का गुन्ह्यातील निलेश घायवळ टोळीचा फरार आरोपी मांजरीतून जेरबंद

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर - पुणे शहरात गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने मोठी कारवाई केली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मोक्का गुन्ह्यातील निलेश घायवळ टोळीचा फरार आरोपी मांजरीतून जेरबंद पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई
मोक्का गुन्ह्यातील निलेश घायवळ टोळीचा फरार आरोपी मांजरीतून जेरबंद पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई

Pune Crime :पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर - पुणे शहरात गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने मोठी कारवाई केली आहे. मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील ६ महिन्यांपासून फरार असलेला निलेश घायवळ टोळीचा पाहिजे असलेला आरोपी निखिल सुभाष ठोंबे (वय १९, रा. दारूवाला पुलाजवळ, नाना पेठ, पुणे) याला शिताफीने अटक केली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासूनच फरार होता.https://maharashtramirror.com/ Pune crime

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे आरोपींचा शोध घेतला जात असताना, युनिट-३ कडील पोलीस अंमलदार आशिष राठोड यांना गोपनीय बातमी मिळाली. पोलीस अंमलदार अतुल साठे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मांजरी बुद्रुक येथे असल्याची खात्री केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मांजरी येथील बालाजी अपार्टमेटला सर्व बाजूंनी वेढा घातला. आरोपी निखिल ठोंबे याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता गुरूवारी (दि.२९)जागेवरच जेरबंद केले. पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपीला कोथरुड विभागाच्या तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें