Pimpari news: निघोजे एमआयडीसीतील कंपनीत सव्वापाच लाखांची चोरी
Pimpari news:पिंपरी, महाराष्ट्र मिरर : निघोजे एमआयडीसीतील रोटा फ्री इंडिया प्रा.
1 मिनट पठन

Pimpari news: कंपनीतून ‘लॉकिंग असेम्ब्ली’चे पार्ट लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
Pimpari news:पिंपरी, महाराष्ट्र मिरर : निघोजे एमआयडीसीतील रोटा फ्री इंडिया प्रा. लि. कंपनीत प्रवेश करून तब्बल ५ लाख २१ हजार ३५७ रुपयांचे लॉकिंग असेम्ब्लीचे पार्ट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनी बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. https://maharashtramirror.com/ Pimpari news
या प्रकरणी राहुल शहानाप्पा मण्णे (वय २४, सध्या रा. चिंबळी फाटा, कुरुळी, ता. खेड; मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथील एमआयडीसी फेज-३ मध्ये रोटा फ्री इंडिया प्रा. लि. कंपनी आहे. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान कंपनी बंद होती. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश केला आणि त्याने कंपनीमध्ये ठेवलेले एकूण ५ लाख २१ हजार रुपये किमतीचे लॉकिंग असेम्ब्लीचे पार्ट चोरून नेले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक घुले पुढील तपास करीत आहेत.
