मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : निगडी प्राधिकरणात मेहुण्याने अडीच लाखांचे दागिने व रोकड पळवली

Pune News :पिंपरी: नातेसंबंधाचा गैरफायदा घेत घरात पाहुणा म्हणून आलेल्या मेहुण्यानेच कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

निगडी प्राधिकरणात मेहुण्याने अडीच लाखांचे दागिने व रोकड पळवली
निगडी प्राधिकरणात मेहुण्याने अडीच लाखांचे दागिने व रोकड पळवली

Pune News : रोख रक्कम आणि दागिने असा अडीच लाखांचा मुद्देमाल चोरला

Pune News :पिंपरी: नातेसंबंधाचा गैरफायदा घेत घरात पाहुणा म्हणून आलेल्या मेहुण्यानेच कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ही घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्राधिकरणातील सेंट्रल एक्साइज कॉलनीत घडली. या प्रकरणी विनोद मलप्पा नेवडे (२८, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित रमेश पाटील (३५, रा. चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित पाटील हा फिर्यादी विनोद यांचा मेहुणा आहे. तो विनोद यांच्या घरी आला होता. विनोद यांची नजर चुकवून त्याने कपाटातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २,५७,६५६ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें