Pune Crime : जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांवर गुन्हा
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : हॉटेलच्या इमारतीत पैशांवर तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले.
1 मिनट पठन

Pune Crime : निगडी पोलिसांची कारवाई
Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : हॉटेलच्या इमारतीत पैशांवर तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. थरमॅक्स चौकाजवळील हॉटेल ऐश्वर्या येथे कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
विनोद बाबूभाई पटेल (वय ६५, निगडी), मनसुख गोवर्धन परमार (वय ५१, निगडी), दामजी लक्ष्मण वरू (वय ६७, गुजरात), रसिकधर मसींग परमार (वय ६०, निगडी), अशोक नारायण राठोड (वय ५८, पिंपरी), दिनेश उदोजी चव्हाण (वय ५१, निगडी), ललित गिरधर परमार (वय ४८, निगडी) यांच्यासह हॉटेल व्यवस्थापक व जागा मालक प्रकाशन यल्लाप्पा कराईल (वय ६८, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल दीपक पिसे यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune crime
थरमॅक्स चौकाजवळील हॉटेल ऐश्वर्या येथे पैशांवर तीन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. कारवाईत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे जुगाराचे कॉईन्स, तीन पत्ते कॅट आणि ३८ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करत जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
