मुख्य सामग्री पर जाएँ

Palamu News : पलामूच्या जंगलात नव्या वाघाची एन्ट्री; तीन जिल्ह्यांत हाय अलर्ट

Palamu News पलामू : पावलांचे ठसे आणि जनावरांच्या शिकारीमुळे वन विभाग सतर्क रांची : झारखंडमधील एकमेव संरक्षित व्याघ्र प्रकल्प असलेल्या पलामू व्याघ्र प्रकल्पात (PTR) एका नव्या प्रौढ वाघाचा वावर आढळून आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पलामूच्या जंगलात नव्या वाघाची एन्ट्री; तीन जिल्ह्यांत हाय अलर्ट
पलामूच्या जंगलात नव्या वाघाची एन्ट्री; तीन जिल्ह्यांत हाय अलर्ट

Palamu News पलामू : पावलांचे ठसे आणि जनावरांच्या शिकारीमुळे वन विभाग सतर्क रांची : झारखंडमधील एकमेव संरक्षित व्याघ्र प्रकल्प असलेल्या पलामू व्याघ्र प्रकल्पात (PTR) एका नव्या प्रौढ वाघाचा वावर आढळून आला आहे. जंगल परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने तसेच पाळीव जनावरांची सातत्याने शिकार होत असल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. पलामू, गढवा आणि लातेहार या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून वाघाच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. पलामू व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रजेशकांत जेना यांनी नव्या प्रौढ वाघाच्या उपस्थितीला दुजोरा दिला आहे.palamu News https://maharashtramirror.com/
जंगल परिसरात आढळलेल्या पावलांच्या ठशांच्या आधारे हा पूर्ण वाढ झालेला नर वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय परिसरातील पाळीव जनावरांची सातत्याने होत असलेली शिकार लक्षात घेता वन विभागाने या वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. या वाघाची सध्या ‘T07’ अशी नोंद करण्यात आली आहे. अद्याप त्याचे स्पष्ट छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेले नाही.Palamu News https://maharashtramirror.com/
वाघाच्या संभाव्य हालचालींचा मार्ग निश्चित करण्यासाठी संबंधित कॉरिडोरमध्ये अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच संभाव्य मार्गांवर गस्त वाढवण्यात आली असून वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. वाघाचा मानवी वस्तीत प्रवेश होऊ नये आणि पाळीव जनावरांचे संरक्षण करता यावे, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. पलामू, गढवा आणि लातेहार जिल्ह्यांच्या सीमाभागात अतिरिक्त वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी जंगल परिसरात अनावश्यकपणे प्रवेश करू नये, तसेच वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून विशेष यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ palamu News
दरम्यान, पलामू व्याघ्र प्रकल्पाचा परिसर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील जंगलांशी नैसर्गिक कॉरिडोरद्वारे जोडलेला आहे. बांधवगड आणि संजय दुबरी व्याघ्र प्रकल्पांशी या भागाची जोडणी असल्याने वाघ नैसर्गिक मार्गांचा वापर करून एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करू शकतात. त्यामुळे ‘T07’ हा वाघही अशाच नैसर्गिक कॉरिडोरमधून पलामूमध्ये दाखल झाला असण्याची शक्यता वन विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

शेयर करें