New Poona Club | न्यू पुना क्लब येथून ३ चंदनाची झाडे चोरी
वारंवार चंदनाची झाडे चोरीला New Poona Club सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपास करणे अवघड
1 मिनट पठन

पुणे, दि. १४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
पुण्याच्या लष्कर भागात अतिसुरक्षित स्थानावरून चंदनाची झाडे चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्रसिंह रोड, कॅम्प येथील न्यू पूना क्लब येथून वारंवार चंदनाची झाडे चोरीला जात आहेत. पुणे शहरात चंदनाची झाडे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. New Poona Club
याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रसिंह रोड स्थित न्यू पूना क्लब येथून ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ३ चंदनाची झाडे चोरण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सदरील क्लबमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते ज्यामुळे आरोपींचा तपास करणे अवघड होत आहे. New Poona Club
न्यू पूना क्लब येथे लग्न कार्य, कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात, असे असतानाही येथे सीसीटीव्ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. Pune news
हेही वाचा: Maharashtra Politics : भावांनाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ हवा आहे.
