मुख्य सामग्री पर जाएँ

Nepal News : नेपाळमधील महापुराला ‘हिमालयन त्सुनामी’ची उपमा : परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल

Nepal News काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण महापुराने उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

नेपाळमधील महापुराला ‘हिमालयन त्सुनामी’ची उपमा
नेपाळमधील महापुराला ‘हिमालयन त्सुनामी’ची उपमा

Nepal News काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण महापुराने उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला. या आपत्तीचे वर्णन परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी ‘हिमालयन त्सुनामी’ असे केले.https://maharashtramirror.com/ Nepal News

नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ व खडकांच्या दरडी कोसळल्याने अचानक पूर आला. दुर्घटनेत मृतांचा आकडा १,२५०च्या पुढे गेला असून, ४,८००हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. बाधित भागात शोध व बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Nepal News

हवामान बदलामुळे हिमालयीन भागातील आपत्तींचा धोका वाढत असल्याचे सांगत खनाल यांनी चीन, अमेरिका आणि भारतासारख्या मोठ्या औद्योगिक देशांनी असुरक्षित राष्ट्रांना मदत व भरपाई देण्याची ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे म्हटले. या संकटात आंतरराष्ट्रीय समुदायाने दिलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले. हवामान बदलाच्या वाढत्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी जागतिक पातळीवर ठोस उपाययोजना आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करें