Nepal News : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार ; हजारहून अधिक लोक गेले वाहून
Nepal News : नेपाळ: तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप घेतलं आहे.
1 मिनट पठन

Nepal News : नेपाळ: तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप घेतलं आहे. आज सकाळी रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले तर घर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अनेक नदीकाठच्या वस्तींचं नुकसान झालं आहे. नेपाळने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवले आहे. बुधवारी (दि.२६) आलेल्या या पुरात मृत्यू, जखमी आणि मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाहीय. परिस्थितीची गंभीरता बघता जवळपासच्या पाच जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलं आहे.https://maharashtramirror.com/ Nepal News

'ग्लेशियल लेक आउटबर्स्ट' प्राथमिक माहितीनुसार, उत्तरी रसुवामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः तिमुरे बाजार परिसर, तिमुरे कस्टम ऑफिस आणि स्याब्रुबेसीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हाधिकारी नुकसान झालेल्या भागाची विस्तृत माहिती गोळा करत आहे. हाइड्रोलॉजीच्या तज्ञांचं म्हणणं आहे की, पाण्याचा अचानक प्रवाह स्थानिक पावसाचं कारण नाही तर तिबेटमध्ये 'ग्लेशियल लेक आउटबर्स्ट' महापूर म्हणजे ग्लेशियर सरोवर फुटल्यानं आलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत 1000 हून अधिक लोक वाहून गेले आहेत. उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्ष चमेली गुरुंग यांच्या म्हणण्यानुसार, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या वस्त्यांना पुरामुळे मोठा फटका बसला आहे.
