मुख्य सामग्री पर जाएँ

एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा ३० मे रोजी

३५५ कॅडेट्स प्रशिक्षण पूर्ण करून अकादमीतून उत्तीर्ण होणार

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा ३० मे रोजी

३५५ कॅडेट्स प्रशिक्षण पूर्ण करून अकादमीतून उत्तीर्ण होणार

निलेश राऊत
पुणे:
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा ३० मे रोजी खडकवासला येथील खेतरपाल परेड मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे परीक्षण अधिकारी म्हणून उपस्थित राहून संचलनाची पाहणी करणार आहेत.

तस्वीरें · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

स्प्रिंग टर्म-२०२६ अंतर्गत आयोजित या सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अंदाजे ३५५ कॅडेट्स प्रशिक्षण पूर्ण करून अकादमीतून उत्तीर्ण होणार आहेत.

कठोर लष्करी आणि शैक्षणिक प्रशिक्षणाची यशस्वी सांगता
एनडीएमधील कठोर लष्करी आणि शैक्षणिक प्रशिक्षणाची यशस्वी सांगता या भव्य संचलनाद्वारे होणार आहे. दीक्षांत संचलन सोहळ्यापूर्वी २९ मे रोजी एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुणे न्यूज

शेयर करें